उत्तर प्रदेशच्या बालियामध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत मोठा घोटाळा झालेला असताना झाशीमध्येही असाच नवा घोटाळा समोर आला आहे.
येथे विवाह सोहळ्यात पैसे मिळवण्यासाठी भाऊजीसोबतच लग्न लावून देण्यात आले. लग्नात सप्तपदी सुरू असतानाच वधूने सिंदूर पुसला असता हा प्रकार समोर आला.
विवाह सोहळ्यात एक जोडपे संशयास्पद वागत होते. त्यांची चौकशी केली असता झाशीच्या बामोर येथील रहिवासी असलेल्या खुशीचे लग्न मध्य प्रदेश छतरपूरच्या ब्रिषभानसोबत निश्चित झाले होते. वधूचा भाऊजी आणि कथित वराने सांगितले की, तो अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून वरांच्या रांगेत बसला
मी ब्रिषभान नसून, माझे नाव दिनेश आहे. माझे आधीच लग्न झाले असून, खुशीचा मी भाऊजी असल्याचे त्याने सांगितले. सरकारने दिलेला पैसा हडप करण्यासाठी हा सगळा खेळ केल्याचे त्याने सांगितले.
समाजकल्याण अधिकारी ललिता यादव यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तपासात दोषी आढळल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
तरुणी रोज रात्री प्रियकराला घरी बोलवायची. पण तिचे हे गुपित आई-वडिलांसमोर येऊ नये यासाठी तिने धक्कादायक पाऊल उचलले. गेल्या तीन महिन्यांपासून तिचा हा कारमाना सुरू होता. एक अज्ञात मुलगा रोज रात्री परिसरात फिरतो हे शेजाऱ्यांनी पाहिल्यावर त्यांनी मुलीच्या पालकांना सांगितले. त्यांनंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आले. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत कोणीतीही तक्रार दाखल केली नाही.
मुलगी गेल्या तीन महिन्यांपासून आई-वडिलांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकून त्यांना खाण्यासाठी देत होती. जेव्हा तिचे आई-वडिल गाढ झोपेत असत तेव्हा ती प्रियकराला घरी बोलवत होती आणि कुटुंबीयांना जाग येण्याच्या आधी त्याला तिथून जायला भाग पाडत होती. जेव्हा परिसरातील लोकांना संशय आला तेव्हा त्यांनी तिच्या वडिलांना याबाबत विचारले.
या बाबत पोलिसांना सूचना मिळताच युवकाच्या कुटंबीयांना देण्यात आली. तेव्हा युवक व युवती दोघांच्याही कुटुंबीयांमध्ये मोठा वाद रंगला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षातील वाद समजावून शांत केला. दरम्यान, या प्रकरणात आत्तापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाहीये, अशी माहिती पोलिसांनी दिली.
उत्तर प्रदेशच्या पिलीभीत जिल्ह्यातील वाघाच्या एन्ट्रीने अनेकांची झोड उडाली. या वाघाने जंगलातून थेट लोकवस्तीत प्रवेश केल्यामुळे स्थानिकांची चांगलीच भांबेरी उडाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्येय, येथील गुरुद्वाराच्या भिंतीवर वाघ आराम करताना दिसून येतो, तर भिंतीवर राजेशाही थाटात चालतानाही दिसून येत आहे. वाघाला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केल्याचंही व्हिडिओत दिसून येते. दरम्यान, वाघ भिंतीवर आराम करत असल्याचे पाहून तत्काळ वनविभागाने चारी बाजुंनी जाळी बांधली आहे.
पिलीभीत जिल्ह्याच्या कलीनगर तालुक्यातील ही घटना असून अटकोना गावात मध्यरात्री २ वाजता वाघाने शिरकाव केला. स्थानिकांनी वाघाला पाहिल्यानंतर तत्काळ वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर, वन विभागानेही घटनास्थळी धाव घेत चारही बाजुंनी जाळी बांधून वाघाला बंदिस्त केलं आहे. येथील एका गुरुद्वाराच्या भिंतीवर वाघ बसल्याचे स्थानिकांनी पाहताच, वाघाला पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली. विशेष म्हणजे सकाळपर्यंत वाघ त्याच भींतीवर दबा धरुन बसला होता, तेथेच टेहाळणी करत होता. त्यामुळे, सकाळी वाघाला पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते.
दरम्यान, वन विभागाचे पथक वाघाला पकडून अभयारण्यात नेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, वाघ लोकवस्तीत असल्याने आणि लोकांची मोठी गर्दी असल्याने अडचणींचा सामना वनविभागाला करावा लागत आहे. मात्र, पिलीभीत जिल्ह्यात वाघ लोकवस्तीत येण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे, स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.